ओ.पी. गुप्ता, रश्मी शुक्ला लोकायुक्त मंडळावर; लोकभवनावर आज शपथविधी (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

ओ.पी. गुप्ता, रश्मी शुक्ला लोकायुक्त मंडळावर; लोकभवनावर आज शपथविधी

वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी असताना सरकारी सेवेचा राजीनामा दिलेले सनदी अधिकारी ओ. पी. गुप्ता, राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त मंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.

Swapnil S

मुंबई : वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी असताना सरकारी सेवेचा राजीनामा दिलेले सनदी अधिकारी ओ. पी. गुप्ता, राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त मंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.

राज्याच्या लोकायुक्त निवडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेऊन लोकायुक्त मंडळावरील सदस्यांच्या नावावर चर्चा केली. यावेळी लोकायुक्त मंडळाचे सदस्य म्हणून गुप्ता, शुक्ला यांच्यासह न्यायिक सदस्य म्हणून सुरेंद्र तावडे आणि सुवर्णा केवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

शुक्रवारी लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या चौघांना राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गुप्ता यांच्या जागी रस्तोगी

दरम्यान, ओ. पी. गुप्ता यांच्या जागी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून विकासचंद्र रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज रस्तोगी यांच्या बदलीचा आदेश जारी केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल; सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी साखळी, कार्यशाळेचे आयोजन

Mumbai : १११ क्र.बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त

Solapur : पुढचे आंदोलन थेट ‘वर्षा’वर; मनोज जरांगेंचा इशारा

Mumbai : मृतांचा आकडा आठवर! घाटकोपर दरड दुर्घटनेत तब्बल ३० तासांची शोधमोहीम संपली; मोठ्या दगडांचा बचावकार्यात अडथळा

Pune : मोशी कचरा डेपो दुर्घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, दोन चिमुकल्या मुली पोरक्या