पंढरपुरात युवकाचा उष्माघाताने मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

पंढरपुरात युवकाचा उष्माघाताने मृत्यू

राज्यात उष्णतेची लाट अद्याप ओसरली नसून विदर्भात तापमान ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहचले आहे, तसेच विदर्भातील अकोल्यासह चार जिल्ह्यात तापमानाने ४५ अंशाचा आकडा पार केला असून सोलापूर आणि लातूरमध्येही पारा चढाच आहे.

Swapnil S

सोलापूर : राज्यात उष्णतेची लाट अद्याप ओसरली नसून विदर्भात तापमान ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहचले आहे, तसेच विदर्भातील अकोल्यासह चार जिल्ह्यात तापमानाने ४५ अंशाचा आकडा पार केला असून सोलापूर आणि लातूरमध्येही पारा चढाच आहे. लातूरमध्ये बुधवारी एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर, आता बुधवारी पंढरपुरातही उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पंढरपुरात एका २४ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दिनेश प्रकाश देशमुख हा तरुण ऊनातून घरी आल्यानंतर आजारी पडला.

घरी दुपारी साडेतीन चार वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्याचा प्राण गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत दिनेश देशमुख राहात असलेले घर हे पूर्ण पत्र्याचे असून यातच दुपारच्या उन्हाचा त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये असून जिल्ह्यातील पंढरपूरमध्येही तापमान ४१ अंश सेल्सियस पासून थेट ४३ ते ४४ डिग्रीपर्यंत वाढत आहे.

Mumbai : कचरा टाकणाऱ्या ठिकाणी CCTVची नजर; बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे सक्त निर्देश

राज्यात १२ नवीन डायलिसिस केंद्रे; किडनी रुग्णांना दिलासा

केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा; राज्य सरकारचा निर्णय

AIचा वापर आणि रोजगार... दोन्हीही वाढणार; राज्याचे कृत्रिम बुद्धिमता धोरण जाहीर, ५ वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

ठाकरे गटाची दानवेंना उमेदवारी, काँग्रेस संतप्त; विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे