लाच मागितल्याने परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ACB च्या जाळ्यात 
महाराष्ट्र

लाच मागितल्याने परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ACB च्या जाळ्यात

बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले. तक्रारदाराकडे ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदाराने एका प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

Swapnil S

बीड : बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले. तक्रारदाराकडे ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदाराने एका प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये घेण्याचे ठरले होते. परंतु, तहसीलदार मुंडे यांना तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराला ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आलेली होती. प्रत्यक्षात २० हजार रुपयांमध्ये तडजोडीने हे प्रमाणपत्र देण्याचे ठरले होते. या अनुषंगाने शुक्रवारी एका पथकाने प्रत्यक्ष तहसील कार्यालयात दाखल होत, या लाचप्रकरणी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर कारवाई केली.

तक्रारदाराच्या हालचालींवरून तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्षात ही लाच स्वीकारली नसली तरी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवश्यक सर्व पुरावे संकलित केले. सर्व शहानिशा केल्यानंतर तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे दोषी असल्याचे आढळले. त्यानुसार त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

एअरपोर्टकडे निघालेल्या महिला केबिन क्रूवर बलात्कार; २३ वर्षीय कॅब चालक अटकेत

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत