Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये आई-मुलाचा मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये आई-मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ३३ वर्षीय महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

Swapnil S

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ३३ वर्षीय महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी महिलेने लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, त्यात तिने दीर्घकाळाच्या आजारपणामुळे मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिली.

भांगड कुटुंब मूळचे राजस्थानचे असून, गेल्या दोन वर्षांपासून ते डांगे चौकातील सिग्नेचर पार्क सोसायटीत वास्तव्यास होते. एकता गृहिणी होत्या, तर त्यांचे पती मनोज भांगड हे येरवडा येथील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

सीसीटीव्ही घटनेनंतर पोलिसांनी आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सोसायटीतील फुटेजचीही तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार