(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० एप्रिल रोजी नांदेडला सभा

नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा गेल्या आठवड्यात पार पडल्यानंतर...

Swapnil S

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा गेल्या आठवड्यात पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमधील जाहीर सभा येत्या शनिवारी (दि. २०) होत असल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली. त्यापाठोपाठ रविवारी (दि. २१) केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा मुखेड येथे निश्चित झाली आहे. तसेच २० तारखेला नांदेडसोबतच परभणी येथेही मोदींची सभा ठेवण्याचे नियोजन सुरू झाले आहे.

निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपा आणि मित्रपक्षांनी आपली यंत्रणा वाढवत शहरी आणि ग्रामीण भागात मेळावे, बैठका, सभा आणि लोकांशी संवाद या माध्यमांतून प्रचार सुरू ठेवला आहे. पक्षाचे स्टार प्रचारक अशोक चव्हाण यांनी शहराच्या वेगवेगळ्या प्रभागातील सभांनाही हजेरी लावण्याचे सत्र सुरू केले आहे. सोमवारी ते भोकर तालुक्यातील पिंपळढव जिल्हा परिषद गटाचा दौरा करणार आहेत, असे सांगण्यात आले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश