प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

आहार खर्चाच्या दरवाढीस मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावाढीस त्यांच्या सुदृढ आरोग्याला प्राधान्य देण्यात येते. विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील प्राथमिक (१ ली ते ५ वी) आणि उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यात येतो.

Swapnil S

मुंबई : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावाढीस त्यांच्या सुदृढ आरोग्याला प्राधान्य देण्यात येते. विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील प्राथमिक (१ ली ते ५ वी) आणि उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत आता प्राथमिक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दररोज ६.७८ रुपये, तर उच्च प्राथमिक वर्गासाठी १०.१७ रुपये इतका आहार खर्च मंजूर करण्यात आला आहे.

सुधारित दर १ मे २०२५ पासून लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत संबंधित शाळांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तांदूळ व इतर धान्यांचा पुरवठा केला जातो.

इयत्ता पहिली ते पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इयत्ता ६ वी ते ८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो.

या योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार या दरात सुधारणा करण्यात आली आहे.

यापूर्वी प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च प्राथमिक वर्गासाठी ६.१९ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ९.२९ रुपये निश्चित करण्यात आली होती.

दरवाढीमुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वयंपाकाच्या माध्यमातून सकस भोजन उपलब्ध होईल, तर नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत जेवण पुरवणाऱ्या यंत्रणांना नव्या दरांनुसार अनुदान मिळणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील शालेय पोषण कार्यक्रम अधिक बळकट होणार असून विद्यार्थ्यांच्या पोषण स्थितीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आहार खर्चाची वर्गवारी

प्राथमिक (१ ली ते ५ वी)

  • एकूण खर्च - ६.७८ रुपये

  • धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च - ४.१९ रुपये

  • इंधन व भाजीपाला खर्च - २.५९ रुपये

उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी)

  • एकूण खर्च - १०.१७ रुपये

  • धान्यादी माल खर्च - ६.२९ रुपये

  • इंधन व भाजीपाला - ३.८८ रुपये

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video