महाराष्ट्र

... त्या बॅनरवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

हे काही अतिउत्साही लोकांनी केलेले काम असावे. काही लोक हे अशी कामे बातम्यांसाठी करतात.

नवशक्ती Web Desk

राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार पुढे येत आहेत. अजित पवार यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच भावी मुख्यमंत्री असतील, अशी पोस्टर्स आता नागपुरात लागले, त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

मला भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावणाऱ्यांनी ते काढावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असा मूर्खपणा भाजपच्या कोणी करू नये. हे काही अतिउत्साही लोकांनी केलेले काम असावे. काही लोक हे अशी कामे बातम्यांसाठी करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2024 मध्ये शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून जिंकू, असे ते म्हणाले.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण