महाराष्ट्र

प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलिस कोठडी; संतप्त शिवप्रेमींना चकवत पोलिसांनी कोर्टात केले हजर

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Krantee V. Kale

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. गेल्या महिन्याभरापासून तो फरार होता. अखेर सोमवारी दुपारी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी तेलंगणमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला आज सकाळी कोल्हापूरमध्ये आणले गेले आणि दुपारी १२ च्या सुमारास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी वकिलांनी कोरटकरची ७ दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र, जिल्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोरटकरला कोर्टात हजर करतेवेळी परिसरात संतप्त शिवप्रेमींची गर्दी जमली होती. हातात कोल्हापूरी चप्पला घेऊन काही शिवप्रेमी उभे होते. पण हल्ल्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आणि गर्दीला चकवा देत कोरटकरला कोर्टात हजर केले. त्याला कोर्टाबाहेर आणतानाही शिवप्रेमी त्याच्या अंगावर धावून गेले होते. पण सतर्क पोलिसांनी त्यांना रोखलं.

दरम्यान, अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. आता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यामुळे २८ मार्चपर्यंत कोरटकरची कसून चौकशी केली जाणार आहे.

मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी

झाडांना दिव्यांच्या माळांनी जखडू नका! पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना भावनिक आवाहन

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती