Pune : चाकणच्या रस्त्यांची कामे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करा! जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला ॲक्शन प्लॅन  
महाराष्ट्र

Pune : चाकणच्या रस्त्यांची कामे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करा! जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला ॲक्शन प्लॅन

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आणि इतर पायाभूत सुविधांच्या गंभीर प्रश्नांवर तात्काळ तसेच कायमस्वरूपी प्रभावी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत चाकण परिसरातील वाहतूक कोंडीवर धडक ॲक्शन प्लॅन जाहीर करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आणि इतर पायाभूत सुविधांच्या गंभीर प्रश्नांवर तात्काळ तसेच कायमस्वरूपी प्रभावी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत चाकण परिसरातील वाहतूक कोंडीवर धडक ॲक्शन प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. या कृती आराखड्यानुसार, चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साइडपट्ट्यांची दुरुस्ती करण्याचे काम येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी डुडींनी दिले.

निर्धारित मुदतीत रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांवर थेट नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष निर्देशानुसार, चाकण औद्योगिक परिसरातील समस्यांवर प्रभावी समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या सह-अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत महसूल विभाग, पोलीस व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रस्त्यावर वाहन पार्क करण्यास बंदी, जप्तीची कारवाई होणार

या समस्येचे तात्काळ नियोजन करण्यासाठी एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी वापर करण्यात येईल तसेच तळेगाव ते भंडारा डोंगर परिसरातील उपलब्ध जागांचाही पार्किंगसाठी अत्यंत पद्धतशीर आणि नियोजनबद्ध वापर केला जाणार आहे. येत्या शुक्रवारपासून चाकणच्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करण्यास पूर्णतः प्रतिबंध घालण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर थेट वाहन जप्तीसह कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, संपूर्ण चाकण पट्ट्यात यासाठी झिरो टॉलरन्स धोरण राबवले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

मुंबई महापालिकेच्या कारभारात ५० ‘फेलो’; स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसह खाते प्रमुखांच्या दिमतीसाठी नियुक्ती

दिव्यांगांसाठी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित; मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना दिलासा

Mumbai : विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा