Pune : प्रेमाच्या जाळ्यात ओढून डॉक्टरकडून १४ लाखांची खंडणी उकळली; महिलेविरोधात गुन्हा दाखल 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Pune : प्रेमाच्या जाळ्यात ओढून डॉक्टरकडून १४ लाखांची खंडणी उकळली; महिलेविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका डॉक्टरांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेने डॉक्टरांच्या रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असणारी वही चोरून नेली व ती परत करण्यासाठी आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका डॉक्टरांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेने डॉक्टरांच्या रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असणारी वही चोरून नेली व ती परत करण्यासाठी आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली असून, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित डॉक्टरांचा धानोरी येथील भैरवनगर परिसरात स्वतःचा दवाखाना आहे. काही काळापूर्वी आरोपी महिला रोहिणी सुकुमार खेमाणे हिची डॉक्टरांशी ओळख झाली होती. त्याचा फायदा घेऊन महिलेने डॉक्टरांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर विविध कारणांचे निमित्त साधून त्यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली, तर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देऊन त्यांना तुरुंगात पाठवण्याची थेट धमकी ही महिला देत असे. या धमक्यांमुळे आणि सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी डॉक्टरांनी महिन्याभरात तिला टप्प्याटप्प्याने तब्बल १४ लाख ३० हजार रुपये दिले.

मात्र, एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही आरोपी महिलेची हाव संपली नाही. तिने डॉक्टरांच्या दवाखान्यातून रुग्णांच्या नोंदी व उपचारांशी संबंधित कागदपत्रे असलेली महत्त्वाची वही चोरून नेली. ही वही स्वतःच्या ताब्यात ठेवून, ती परत हवी असल्यास आणखी १० लाख रुपयांची रोकड द्यावी लागेल, अशी नवी मागणी तिने डॉक्टरांकडे लावून धरली. महिलेच्या या ब्लॅकमेलिंगमुळे पूर्णपणे त्रस्त झालेल्या डॉक्टरांनी अखेर विश्रांतवाडी पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तांदूळ, ज्वारी, तूर, हरभरा कडाडला; दिवाळीच्या तोंडावर किराणा बजेट कोलमडणार

कायदा, पोलिसांची भीती गरजेची : सर्वोच्च न्यायालय

फॉर्म ६ फेरफारांची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, निवडणूक आयोगाला नोटीस; एकमताने किंवा बहुमताने न घेतलेले निर्णय रद्द करणार

Mumbai : ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे तरुणाचा मृत्यू; चार मित्रांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

राज्यावर पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा विभागाचा निर्णय