गणेशोत्सव भक्तीचा की ध्वनिप्रदूषणाचा? डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणेकरांचा एल्गार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

गणेशोत्सव भक्तीचा की ध्वनिप्रदूषणाचा? डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणेकरांचा एल्गार

गणेशोत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला कर्णकर्कश डीजेचा दणदणाट आता अजिबात सहन करणार नाही. प्रशासनाने ध्वनिमर्यादेची कठोर अंमलबजावणी करून डीजेवर बंदी घालावी; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशारा देत ‘गणेशोत्सव भक्तीचा की ध्वनिप्रदूषणाचा?’ असा संतप्त सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी नागरिकांनी एल्गार पुकारला आहे.

Swapnil S

पुणे : गणेशोत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला कर्णकर्कश डीजेचा दणदणाट आता अजिबात सहन करणार नाही. प्रशासनाने ध्वनिमर्यादेची कठोर अंमलबजावणी करून डीजेवर बंदी घालावी; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशारा देत ‘गणेशोत्सव भक्तीचा की ध्वनिप्रदूषणाचा?’ असा संतप्त सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी नागरिकांनी एल्गार पुकारला आहे.

ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठविण्यासाठी ‘पुणेकर अतिरेकी आवाजाला वैतागलेला’ या नावाने सोशल मीडियावर फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना येत्या ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कर्णकर्कश आणि अमर्याद डीजेला ठाम विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या भिंती उभारून कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात गाणी वाजविली जातात. या आवाजाच्या हादऱ्यांमुळे घरांच्या खिडक्या आणि दरवाजे थरथरतात. ज्येष्ठ नागरिक, हृदयरुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

नियम फक्त कागदावर ठेवणार असाल, तर ते बनवलेच कशासाठी? असा सवाल पुणेकरांनी प्रशासनाला केला आहे. डीजेचालक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर थेट गुन्हे दाखल करावेत, ध्वनियंत्रणा जप्त करावी आणि संबंधित मंडळांची परवानगी रद्द करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राजकीय दबावामुळे कारवाई टाळली गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरावे, अशी भूमिकाही नागरिकांनी मांडली आहे.

पुणेकरांचे आवाहन

पुण्यात गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमवर पूर्ण बंदी असावी की मर्यादित आवाजात परवानगी द्यावी, याबाबत नागरिकांचे मत जाणून घेण्यात येत आहे. ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ हवा की नको? याबाबत आपले स्पष्ट मत आणि प्रतिक्रिया ९०९६९२४४६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी. प्रतिक्रिया पाठविताना पूर्ण नाव आणि आपण राहत असलेल्या भागाचा उल्लेख करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

Mumbai Metro 7A : आराखड्यातील चुकीमुळे २६० कोटींचा फटका; सल्लागाराच्या निष्काळजीपणावरून MMRDA वर टीका

मुंबईकरांनो, 'स्वाईन फ्लू' बळावतोय; रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ, तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद

Mumbai : रेल्वे स्थानक परिसर विकासाचे लक्ष्य; आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश; मुलुंड, भांडूप, कांजूरला दिली भेट

गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप