विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश (Photo-X/@madhurimisal)
महाराष्ट्र

विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश

नाशिकमधील आयटी कंपनीतील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणानंतर आता पुण्यातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतही विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Swapnil S

पुणे : नाशिकमधील आयटी कंपनीतील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणानंतर आता पुण्यातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतही विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करून नियमभंग किंवा भेदभाव आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.

तक्रारीनुसार, संबंधित कंपनीतील पुरुष विश्रांती कक्ष काही विशिष्ट गटांकडून धार्मिक विधींसाठी वापरले जात असून, त्या कालावधीत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कार्यालयीन शिस्त यावर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी पत्र पाठवत संबंधित कंपनी प्रशासनाशी समन्वय साधून प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी निष्पक्ष, सखोल आणि कालबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच आवश्यक असल्यास गोपनीय तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा भेदभाव, बळजबरी किंवा नियमभंग आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना कोणताही दबाव, छळ किंवा असुविधा होत आहे का याची खातरजमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कार्यस्थळी सर्व कर्मचाऱ्यांना समान, सुरक्षित आणि निर्बंधमुक्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी