पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी दागिन्यांची बॅग केली परत (All Photos - FPJ)
महाराष्ट्र

पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी दागिन्यांची बॅग केली परत

मेट्रो स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व वेगवान समन्वयामुळे एका प्रवाशाची तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग अवघ्या काही वेळात शोधून प्रवाशाला सुरक्षितपणे परत करण्यात आली आहे.

Swapnil S

पुणे : मेट्रो स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व वेगवान समन्वयामुळे एका प्रवाशाची तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग अवघ्या काही वेळात शोधून प्रवाशाला सुरक्षितपणे परत करण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणा आणि तत्पर कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

आरटीओ पुणे मेट्रो स्थानकावरून एका प्रवाशाची बॅग बॅगेज स्कॅनिंग मशीनजवळ विसरली असल्याची माहिती पुणे रेल्वे स्थानक मेट्रो स्थानकातील स्थानक नियंत्रकांना फोनद्वारे मिळाली. या बॅगमध्ये अंदाजे १५ तोळे सोन्याचे मौल्यवान दागिने असल्याची माहिती देण्यात आली होती.

माहिती मिळताच पीआरएस स्थानक नियंत्रकांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि संबंधित महिला प्रवाशाची ओळख पटवली.

दरम्यान, आरटीओ मेट्रो स्थानकावरील स्कॅनिंग मशीनजवळ तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना ती बेवारस बॅग आढळली होती. त्यांनी ती सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ ताब्यात घेतली. तपासणी केली असता, त्या बॅगेत प्रवाशाने सांगितल्याप्रमाणे अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे दिसून आले. यानंतर पीआरएस स्थानक नियंत्रकांनी आरटीओ नियंत्रण कक्षाला बॅग मिळाल्याची माहिती दिली आणि संबंधित प्रवाशाशी संपर्क साधला.

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष