"त्याला ठेचून मारा अन् मला सांगू ही नका"; नसरापूर प्रकरणानंतर आरोपीच्या पत्नी-मुलाची संतप्त प्रतिक्रिया 
महाराष्ट्र

"त्याला ठेचून मारा अन् मला सांगूही नका"; नसरापूर प्रकरणानंतर आरोपीच्या पत्नी-मुलाची संतप्त प्रतिक्रिया

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या मदतीने गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. या घटनेमुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Mayuri Gawade

पुण्याजवळील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, एबीपीशी बोलताना आरोपीच्या कुटुंबीयांनीही तीव्र संताप व्यक्त करत त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

"त्याच ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे" – आरोपीची पत्नी

नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीच्या वृद्ध पत्नीने पतीविरुद्ध संतप्त भूमिका घेतली. गेल्या १० वर्षांपासून त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"त्या बाळाची हत्या ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे. मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. मला कुणी त्याच्या अंत्यविधीची बातमीही सांगू नका. त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. फक्त फाशी नाही, त्याला ठेचलं पाहिजे, जिवंत जाळलं पाहिजे. तरीही माझ्या मनातील आग शांत होणार नाही." अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

"बाप म्हणवून घ्यायची लाज वाटते" – मुलाची प्रतिक्रिया

आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. "मला त्याला माझा बाप म्हणवून घ्यायलाही लाज वाटते. त्या चिमुकलीवर त्याने अमानुष कृत्य केलं आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे," असे तो म्हणाला.

"त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे. त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. ती माझ्या भाचीसारखी होती. या घटनेमुळे आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागतोय.” अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

नसरापूरमध्ये नेमकं काय घडलं?

ही भीषण घटना १ मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सुट्टीसाठी आजीच्या घरी आली होती. घटनेच्या दिवशी ६५ वर्षीय आरोपीने तिला गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी दगडाने ठेचून तिची हत्या केली. संशय येऊ नये म्हणून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी गावकऱ्यांसोबत शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला आणि गावात संताप उसळला. तत्काळ पोलिसांना कळवून पुढील कारवाई सुरू करण्यात आली.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, आरोपी याआधीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. त्याची प्रवृत्ती विकृत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. २०१५ साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होऊन शिक्षा झाली होती. मात्र, त्याची जामिनावर सुटका झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृद्ध महिलेवरही अत्याचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

Dombivli : पादचारी पुलावरील फेरीवाल्यांवर कारवाई; गर्दुल्ले, भिकाऱ्यांना पालिकेने हटवले

Ulhasnagar : पहाटेच्या अंधारात ‘ड्रग्ज डील’चा पर्दाफाश; रामकृष्ण कॉलनीत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक