महाराष्ट्र

Pune : नवले ब्रीजवर भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची १५-१६ वाहनांना धडक; ७ ठार, २० जखमी

बंगळूर-मुंबई द्रुतगती मार्गावर कात्रज बोगद्यापुढे नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाल्याने एका कंटेनरने तीव्र उतारावर एक ते दीड किमी परिसरात १५ ते १६ वाहनांना धडक दिली. यामुळे वाहनांनी पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला, चार पुरुष आणि एका चिमुरडीचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Swapnil S

पुणे : बंगळूर-मुंबई द्रुतगती मार्गावर कात्रज बोगद्यापुढे नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाल्याने एका कंटेनरने तीव्र उतारावर एक ते दीड किमी परिसरात १५ ते १६ वाहनांना धडक दिली. यामुळे वाहनांनी पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला, चार पुरुष आणि एका चिमुरडीचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.

या दुर्घटनेत दोन ट्रकच्या मधोमध एक कार अडकल्याने कारमधील प्रवाशांचा होरपळून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात २० ते २५ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की त्यात ट्रकने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत चालक जळून जागीच खाक झाला. एकमेकाला धडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी कटर व क्रेनचा वापर करावा लागला. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बेंगळूर-मुंबई द्रुतगती मार्गावरील वारजे येथील नवले पूल कायम गजबजलेला असतो. सायंकाळच्या सुमारास या भागात वाहनांची प्रचंड गर्दी असते. शनिवारी, रविवारी तसेच औद्योगिक सुटीच्या दिवशी म्हणजे गुरुवारीही येथे मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आलेली असतात.

गुरुवारी सायंकाळीही नवले पुलाच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होती. याच सुमारास राजस्थानची पासिंग असलेला एक कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना नवले पुलाजवळ तीव्र उतारावर कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे वाहनचालकाचे कंटेनरवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. त्यानंतर भरधाव कंटेनरने एकामागोमाग एक पुढील वाहनांना धडका देण्यास सुरुवात केली. त्यात अनेक वाहने चिरडली गेली. त्यात दोन ट्रकच्या मध्ये एक कार सापडली. कार सीएनजीवर असल्याने तिने अचानक पेट घेतला. त्यामुळे त्यात अनेकांचे बळी गेले.

अपघातग्रस्त कारमधून प्रथम दोन महिला व एका मुलीचा आणि दोन पुरुषांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता ससून रूग्णालयात पाठविण्यात आले. अपघातानंतर अग्निशमन दलाची वाहने व जवान मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहने जागेवरुन हटविण्यासाठी कटर व क्रेनचा वापर करावा लागला. नऊ ते दहा रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह कंटेनरमधून बाहेर काढला. त्यानंतर बचावकार्य गतीने सुरू करण्यात आले व एकेक मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलीस उपायुक्त संभाजी पाटील म्हणाले, या अपघातात सहा ते सात जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना खासगी रुiणालयात हलविण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जवळपास २० ते २५ जण यात जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कंटेनरचे ब्रेक निकामी झाले आणि या कंटेनरने समोरील वाहनांना धडक दिली.

सीएनजी कारमुळे आगीचा भडका

कंटेनर एका ट्रकला धडकताना त्याच्यामध्ये एक सीएनजी कार अडकून तिचा चेंदामेंदा झाला व या कारला भीषण आग लागली. यामुळे जवळील इतर वाहनांनीही पेट घेतला. ज्या वाहनांना आग लागली, ती नंतर शमविण्यात आली. अपघातानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून हाती घेण्यात आले.

वाहतूक विस्कळीत

या अपघातामुळे साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली. अपघातग्रस्त वाहने हटविण्यात व जखमींना रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर तीन ते चार तासांसाठी प्रवास टाळण्याचे आवाहन केले. सातारा ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनांनी जुना कात्रज बोगदा घाटमार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

Bihar Election Results 2025 Live Updates: ट्रेंड्सनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष; "धैर्य रखो मेरे भगवान मोदी पर"; कार्यकर्त्यांचा मोदींचा फोटो असलेल्या रथासह जल्लोष

Mumbai : आयुक्तांच्या OSD विरोधात शड्डू; मुंबई पालिका सहाय्यक आयुक्तांचे थेट आयुक्तांनाच पत्र

ठाण्यात तब्बल साडेचार लाख मतदारांची भर; आज जाहीर होणार अंतिम यादी

अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी? ‘वर्षा’वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा

Delhi car blast: दहशतवाद्यांना बाबरीचा बदला घ्यायचा होता; देशभरात ३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा होता कट; तपासातून माहिती उघड