पासपोर्टसाठी पत्त्यांची पडताळणी सखोल होणार; पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्याचा निर्णय 
महाराष्ट्र

पासपोर्टसाठी पत्त्यांची पडताळणी सखोल होणार; पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्याचा निर्णय

कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर त्याला पासपोर्ट कसा मिळाला, या प्रश्नावरून पासपोर्ट यंत्रणेवर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पासपोर्ट कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, संशयास्पद पत्त्यांच्या प्रकरणात पुन्हा एकदा सखोल पडताळणी करण्याचे पोलिसांना सूचना देण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली.

Swapnil S

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर त्याला पासपोर्ट कसा मिळाला, या प्रश्नावरून पासपोर्ट यंत्रणेवर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पासपोर्ट कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, संशयास्पद पत्त्यांच्या प्रकरणात पुन्हा एकदा सखोल पडताळणी करण्याचे पोलिसांना सूचना देण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे संघाचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन पासपोर्ट काढणे तसेच नूतनीकरणासाठी चार दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. विनोद गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी उप पासपोर्ट अधिकारी सृष्टी पांडे, संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, आशिष देशमुख, दत्तात्रेय अढागळे तसेच पासपोर्ट कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी जतीन पोटे उपस्थित होते.

या शिबिरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे पासपोर्ट प्रक्रिया चार दिवसांत केली जाणार आहे. शिबिराच्या निमित्ताने डॉ. गायकवाड यांच्याशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी राजदूत म्हणून रशिया, कुवेत आणि फ्रान्समध्ये काम करताना आलेले अनुभव, बदलती शासकीय धोरणे तसेच परदेशात भारतीयांची प्रतिमा याबाबत माहिती दिली. प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित पत्रकारांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले.

निलेश घायवळ प्रकरणानंतर ज्या ठिकाणी कोणी वास्तव्यास नसल्याचा शेरा पोलिसांकडून देण्यात आला आहे, अशा पत्त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. बनावट कागदपत्रे, खोटा पत्ता किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आगामी काळात ई-पासपोर्टचे प्रमाण वाढणार असून, सन २०३५ पर्यंत सर्व पासपोर्ट हे ई पासपोर्ट मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा