पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकामाधीन इमारत कोसळली; १५-२० कामगार अडकल्याची भीती, Video X | ANI
महाराष्ट्र

पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकामाधीन इमारत कोसळली; १५-२० कामगार अडकल्याची भीती, Video

पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान इमारतीचा भाग कोसळला. प्राथमिक माहितीनुसार १५ ते २० कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे.

Mayuri Gawade

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे सुरू असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान बुधवारी (दि. ०८) दुपारी मोठी दुर्घटना घडली. बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, १५ ते २० कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारला जात आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवता यावे यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

घटनास्थळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही पोहोचले असून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकाम सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सध्या प्रशासनाचे मुख्य लक्ष ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यावर असून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करण्यात येणार आहे. मृत्यू किंवा जखमींची अधिकृत संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय