Pune : भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
महाराष्ट्र

Pune : भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

सोमवारी रात्री साने चौक परिसरात नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. काही जण ये-जा करत होते, तर काही दुकानदार दुकाने बंद करण्याच्या तयारीत होते. याचवेळी...

किशोरी घायवट-उबाळे

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चिखली परिसरातील साने चौकाजवळ एका दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. १६) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दुचाकीस्वार सुदैवाने थोडक्यात बचावला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साने चौक परिसरात नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. काही जण ये-जा करत होते, तर काही दुकानदार दुकाने बंद करण्याच्या तयारीत होते. याचवेळी हातात कोयता घेतलेल्या एका तरुणाने दुचाकीस्वाराला लक्ष्य केले. त्याचा पाठलाग करत आरोपीने अचानक त्याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत हल्ला चुकवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि त्याचे प्राण वाचले.

हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये हातात कोयता घेतलेला तरुण दुचाकीस्वाराच्या दिशेने धावताना आणि त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दुचाकीस्वाराने वेळीच बचाव केल्याने कोयत्याचा वार चुकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, या घटनेतील पीडिताने अद्याप चिखली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केलेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोराची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे काम चिखली पोलीस करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आंध्र प्रदेशात ONGC च्या विहिरीतून मोठी गॅसगळती; १ किमी परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, Video

भारतात अश्लील अन् हिंसक कंटेंटला लगाम; मेटाकडून Instagram च्या रिकमेंडेशन सिस्टीममध्ये बदल

दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Mumbai : विरार-चर्चगेट लोकलमध्ये राडा; दोन प्रवाशांच्या भांडणात भिरकावलेला चाकू लागून भलताच प्रवासी जखमी, आरोपी अटकेत

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! पुलावरून बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी