Pune : संतोष पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका (Photo-X)
महाराष्ट्र

Pune : संतोष पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका

सोशल मीडिया प्रभावक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष गजानन पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका झाली.

Swapnil S

पुणे : सोशल मीडिया प्रभावक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष गजानन पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका झाली. मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

२ सप्टेंबर रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओबाबत ३६ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोथरूड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी पंडित यांच्या वकिलांनी आरोपांतील हेतू आणि कथित वक्तव्यांच्या स्वरूपाबाबत युक्तिवाद केला. न्यायालयाने उर्वरित तपासासाठी कोठडी आवश्यक नसल्याचे नमूद करत २५ हजारच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

प्रसारमाध्यमांचे आभार

सुटकेनंतर पंडित यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे थांबवणार नसल्याचे सांगितले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आपल्याला मिळालेल्या जनतेच्या आणि प्रसारमाध्यमांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले.

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

NEET Paper Leak : सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश NTA ची पाहणी करणार

राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीला मिळणार वेग; दोन रेल्वे प्रकल्पांसाठी ९९० कोटी

१०६ पदकांचा विक्रम मोडण्याचे यंदा आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून शानदार प्रारंभ, भारताचे तब्बल ४९६ खेळाडूंचे पथक होणार सहभागी

मुंबईत साथीच्या आजारांचा ताप; तीन महिन्यांत मलेरियाचे ५,९८४ तर डेंग्यूच्या २,१६१ रुग्णांची नोंद