Pune : येरवडा कारागृहात कैद्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : येरवडा कारागृहात कैद्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

येरवडा कारागृहात दोन सराईत गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेला एक कैदी शुक्रवारी (दि.१९) ससून रुग्णालयात मरण पावला. यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नागनाथ कांबळे हे हल्ल्यात मरण पावलेल्या कैद्याचे नाव आहे.

Swapnil S

पुणे : येरवडा कारागृहात दोन सराईत गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेला एक कैदी शुक्रवारी (दि.१९) ससून रुग्णालयात मरण पावला. यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नागनाथ कांबळे हे हल्ल्यात मरण पावलेल्या कैद्याचे नाव आहे.

आकाश सतीश चंडालिया व दीपक संजय रेड्डी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे तसेच आरोपी चंडालिया व रेड्डी गुन्हेगार आहेत. कांबळे एका खुनाच्या गुन्ह्यात २०१९ पासून येरवडा कारागृहात होता. तसेच, एका खुनाच्या गुन्ह्यात चंडालिया व खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात रेड्डीही तुरुंगात आहेत. स्थानिक वर्चस्वाच्या वादातून चंडालिया व कांबळे यांच्यात वैमनस्य होते. कारागृहातही त्यांची अनेकदा भांडणे झाली होती. त्यामुळे, कांबळे याचा काटा काढण्याचा कट चंडालिया याने रचला होता. त्यासाठी तो संधीची वाट पाहत होता.

येरवडा कारागृहात सकाळी बरॅक उघडल्यानंतर कैदी बाहेर आले. मात्र, कांबळे पुन्हा आत जाऊन झोपला. असलेल्या चंडालिया आणि रेड्डी यांनी तो झोपेतच असताना हल्ला चढवला. त्यांनी त्याच्या डोक्यात व कमरेवर अणकुचीदार फरशीच्या तुकड्याने वार केले. या प्रकारामुळे अन्य कैदी घाबरून पळाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर कारागृह रक्षकांनी तेथे धाव घेतली. कांबळे अतिशय गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना कांबळे मरण पावला. याप्रकरणी दोन्ही आरोपीना कारागृहातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या पाळतीवर

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया