महाराष्ट्र

बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या घाऊक बदल्या; कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना एक महिन्याची मुदतवाढ देणारा अध्यादेश जारी होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी राज्यातील ३२ कार्यकारी अभियंता आणि १९८ उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्या केल्या. अलीकडच्या काळात विभागात एकाचवेळी घाऊक प्रमाणात बदल्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना एक महिन्याची मुदतवाढ देणारा अध्यादेश जारी होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी राज्यातील ३२ कार्यकारी अभियंता आणि १९८ उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्या केल्या. अलीकडच्या काळात विभागात एकाचवेळी घाऊक प्रमाणात बदल्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक वर्षे मुंबईत ठाण मांडून बसलेले अभियंता, अधिकारी पुन्हा मुंबईतच बदली मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर मुंबई, अंधेरी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन धात्रक यांची बदली ठाण्यात सार्वजिनक बांधकाम विभाग २ च्या कार्यकारी अभियंतापदी झाली आहे. तर धात्रक यांच्याजागी विशेष प्रकल्प विभाग आरे, गोरेगावच्या कार्यकारी अभियंता गुंजन दिघावकर यांची वर्णी लागली आहे. मुंबईतील एकात्मिक घटक विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांची बदली कार्यकारी अभियंता म्हणून विशेष प्रकल्प विभाग आरे, गोरेगाव येथे झाली आहे. ठाणे क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांची बदली महाड येथे करण्यात आली आहे.

विभागाने कार्यकारी अभियंत्यासह उपविभागीय अभियंत्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत.

जे. जे. रुग्णालय उपविभागासाठी स्पर्धा

उपविभागीय अभियंता रणजित शिंगाडे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या रुग्णालय बांधकाम आणि दुरुस्ती उपविभाग, भायखळा येथे बदली मिळवण्यासाठी अभियंत्यांमध्ये जोरदार स्पर्धा आहे. या जागेसाठी अनेक जण इच्छुक असताना विभागाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मुंबईतील रुग्णालय बांधकाम आणि दुरुस्ती उपविभाग आणि मध्य मुंबई उपविभाग या दोन जागा तूर्त रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार