संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारने उपसमितीचे पुनर्गठन केले आहे.

Swapnil S

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारने उपसमितीचे पुनर्गठन केले आहे.

उपसमितीमार्फत मराठा आरक्षणविषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्या बाजूने मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवण्यात येणार आहे, तसेच विशेष समुपदेशींना समितीकडून सूचना दिल्या जाणार आहेत. न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती उपसमितीकडून ठरविली जाणार आहे.

Mumbai : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! विधान भवन मेट्रो स्थानकावर ए-२ गेटवरील लिफ्ट सुरू; ज्येष्ठ नागरिकांना मोठी सोय

Maharashtra Infra Update: JNPT ते मुंबई-पुणे-गोवा मार्ग जोडणाऱ्या प्रकल्पाला गती; १६ एप्रिलपासून टेंडर प्रक्रिया

Mumbai : निसर्ग उन्नत मार्ग महागला; ७५० रुपयांत मासिक पास योजना, विदेशी पर्यटकांसाठी ३ हजार फी

ठाणे-मुलुंडदरम्यानच्या नव्या स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव; TMC बैठकीत ठराव मंजूर

Mumbai : चेंडू आणण्यासाठी गेला अन् काळाने घाला घातला; मालाडमध्ये ८ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू