प्रतीकात्मक फोटो  ANI
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत पावसाच्या सरी, ठाण्यात सोसाट्याचा वारा

अनेक दिवस उकाड्यापासून हैराण झालेल्या ठाणेकरांना संध्याकाळी सुखद धक्का

प्रतिनिधी

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात ९ ते १० जून पासून पावसाळा सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. डोंबिवलीत रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी पडल्या. कडक उन्हाने त्रस्त झालेले नागरिकांनी पावसात भिजणे पसंत केले. पाऊस पडल्याने अनेकांची तारांबळ उडाली तर काहींना गार गार वाऱ्यात चहा पिण्याचा आनंद लुटला. कामावरून घरी परतण्याची वेळ असल्याने चाकरमान्यांनी काही वेळ रेल्वे स्टेशनवर थांबणे पसंत केले.


ठाण्यात थेंब थेंब अन सोसाट्याचा वारा

गेली अनेक दिवस उकाड्यापासून हैराण झालेल्या ठाणेकरांना संध्याकाळी सुखद धक्का बसला. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि वातावरणात बदल झाला. एकप्रकारे मान्सूनची चाहूल लागली असताना शहराच्या अनेक भागात थेंब थेंब बरसायला सुरुवात झाली. संध्याकाळी काही मिनिटे पडलेल्या पावसाच्या सरीने सुखद गारवा निर्माण झाला. अचानक सुरु झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अवकाशात पक्षी मुक्त संचार करताना दिसले तर मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण पसरलेले पाहायला मिळाले.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून