ठाण्यात मनसे-ठाकरे सेनेत राडा 
महाराष्ट्र

ठाण्यात मनसे-ठाकरे सेनेत राडा; सुपारी मारलीत, तर नारळ फेकण्याचा मनसेचा इशारा

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरही टोमॅटो, नारळ, बांगड्या आणि शेणफेक केली.

Swapnil S

ठाणे : बीडमध्ये शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. या घटनेला प्रत्युत्तर देताना मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरही टोमॅटो, नारळ, बांगड्या आणि शेणफेक केली. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील वातावरण तंग झाले असून तुम्ही सुपारी मारलीत, तर आम्ही नारळ फेकू, असा इशारा मनसेने दिला आहे. तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रतिइशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेनेतर्फे भगवा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यासाठी निघालेल्या उद्धव ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी मुलुंड ते ठाणेदरम्यान शेण, टोमॅटो, नारळ, बांगड्या फेक केली. त्यात ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर सभेसाठी गडकरी रंगायतनमध्ये जमलेले उबाठा गटाचे कार्यकर्तेही समोरासमोर आल्याने या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

उद्धव ठाकरे हे गडकरी रंगायतनमध्ये दाखल होताच महिला मनसैनिकांनी घुसून गोंधळ घालत बांगड्या फेकल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल