रामशेठ ठाकूर यांचा पुरस्कार प्रदान सोहळा आज; मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे बंधू राहणार उपस्थित  
महाराष्ट्र

रामशेठ ठाकूर यांचा पुरस्कार प्रदान सोहळा आज; मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

रायगडचे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठेचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मान होणार आहे.

Swapnil S

पनवेल : रायगडचे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठेचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मान होणार आहे.

मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

या सोहळ्यास संस्थेच्या आधारस्तंभ प्रतिभा पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राहुल, प्रियांका स्थानबद्ध; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक, ५० खासदारांसह २५० जण पोलिसांच्या ताब्यात

महायुती, आघाडीत बंडाचे झेंडे; विधान परिषद निवडणुकीत युती, आघाडी धर्माला तिलांजली

पक्षांतर करणाऱ्यांना चिन्ह देता येईल का? शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

बसमध्ये कोंबले, नाशिकला धाडले; काँग्रेस कार्यालयात आदिवासी विद्यार्थी-पोलिसांमध्ये झटापट, ‘टिळक भवन’ला आखाड्याचे स्वरूप

आशुतोष दीक्षित बनले नवे हवाई दल प्रमुख