ANI
महाराष्ट्र

रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, साताऱ्यात ‘रेड अलर्ट’; अंधेरी सब-वे जलमय, तीन वेळा वाहतुकीसाठी बंद

Swapnil S

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून उघडझाप करणारा पाऊस शुक्रवारी, शनिवारी दमदार बरसला. अधूनमधून मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले, तर अंधेरी सब-वे पाण्याखाली गेल्याने तीन वेळा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रस्ते वाहतूक मंदावल्याने ट्राफिक जाम, बेस्ट बस मार्गांत बदल करण्यात आले होते, तर मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होत्या. दरम्यान, रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आल्याचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवार, शुक्रवारपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा शुक्रवारी रात्रीनंतर जोर वाढला. धो धो बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूककोंडी झाली. सायन, वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळील रस्त्यावर पाणी भरल्याने बेस्ट बस मार्गांत बदल करण्यात आले, तर झाडे, झाडांच्या फांद्या कोसळणे, शॉर्टसर्किट, घराचे भाग कोसळणे या घटना कायम असून मुंबईत पडझडीचे सत्र कायम आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबईतील काही भागांत मुसळधार, तर काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मुंबईत रविवारी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.

> रेड अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा

> ऑरेंज अलर्ट

ठाणे, रायगड, पुढील दोन दिवस 'ऑरेंज अलर्ट'

> यलो अलर्ट

मुंबई, पालघर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जळगाव

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था