मुंबई : मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४ हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. मात्र नंतरचे विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करून ही जमीन परत मिळवण्याचा बैठकीत यातील सुमारे १५ एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी केला.
या जमिनीचा बाजारभाव सुमारे ५ हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे १० हजार घरे बांधता आली असती, पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाठ यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली, असा घणाघात रोहित पवार यांनी केला. दरम्यान शिरसाट यांनी पवार यांच्या आरोपांचा इन्कार केला.
संबंधित प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. तसेच, सिडको (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ) या राज्य शासनाच्या नियोजन संस्थेचे निर्णय एका व्यक्तीकडून नव्हे, तर संचालक मंडळाकडून सामूहिकपणे घेतले जातात, असे ते म्हणाले.