गरज वाटल्यास SIT नेमणार; डॉक्टर आत्महत्याप्रकरणी रूपाली चाकणकर यांची माहिती Photo : X (Rupali Chakankar)
महाराष्ट्र

गरज वाटल्यास SIT नेमणार; डॉक्टर आत्महत्याप्रकरणी रूपाली चाकणकर यांची माहिती

डॉक्टर युवतीला न्याय देण्यासाठी महिला आयोग या तपासावर लक्ष ठेऊन आहे. त्यामध्ये काही गडबड वाटल्यास या घटनेचा तपासासाठी 'एसआयटी' नेमली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

कराड : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या बरोबर 'त्या' डॉक्टर युवतीचे अनेक वेळा खटके उडायचे. मात्र ते वाद आयसी कमिटीने मिटविले होते. परंतु दीपावलीच्या सणाला लक्ष्मी पूजन दिवशी फोटो काढण्यावरून तिचा प्रशांत बनकर बरोबर वाद झाला होता, त्यावेळी 'ती' डॉक्टर युवती एका मंदिरात जाऊन बसली होती, तेव्हा तिला प्रशांत बनकरच्या वडिलांनी घरी आणले. मात्र ती तेथून निघून गेली ती थेट हॉटेलमध्ये जात तिथे तिने आत्महत्या केली असून या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असा निर्वाळा देत 'त्या' डॉक्टर युवतीला न्याय देण्यासाठी महिला आयोग या तपासावर लक्ष ठेऊन आहे. त्यामध्ये काही गडबड वाटल्यास या घटनेचा तपासासाठी 'एसआयटी' नेमली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येस एक पोलीस उपनिरीक्षक व अन्य एकजण जबाबदार असल्याने फलटण, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून 'ती' महिला ज्या फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात काम करीत होती तिथे सोमवारी चाकणकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आयसी कमिटीच्या सदस्यांची बैठक घेऊन या घटनेची चौकशी केली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, रुग्णालयाचे डॉ. अंशुमन धुमाळ उपस्थित होते.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...

BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल