ठाकरेंना सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता! उपसभापती सचिन अहिर यांची कबुली 
महाराष्ट्र

ठाकरेंना सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता! उपसभापती सचिन अहिर यांची कबुली

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी अत्यंत कठीण होता, अशी कबुली विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिली.

Swapnil S

मुंबई : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी अत्यंत कठीण होता, अशी कबुली विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिली. आता मी घटनात्मक पदावर आहे. त्यामुळे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. तसेच राजकारणातील कटुता कमी करण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.

सचिन अहिर यांनी गुरुवारी विधानभवनातील पत्रकार कक्षात येऊन पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी उबाठा गटाचे आणखी काही आमदार आपल्या सोबत येतील, असे संकेत दिले होते. तसेच शिंदे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा संदर्भ देत, सचिन अहिर मोठी इनिंग खेळतील, असे म्हटले होते. याबद्दल विचारले असता, माझ्या मते मी आता एकटाच पुरेसा आहे. त्यामुळे आधी मला माझी इनिंग खेळू द्या. आधी मला चांगली धावसंख्या उभारू द्या. त्यानंतर आणखी खेळाडूंना संघात घेण्याबाबत बोलू, असे सूचक विधान अहिर यांनी केले.

सध्याच्या विधान परिषद सदस्यांमध्ये मी आणि सुनील शिंदे हे धनुष्यबाण या चिन्हावर एकत्रित शिवसेनेकडून निवडून आलो आहोत.

आमदार किरण सरनाईक सहयोगी सदस्य

विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सरनाईक यांना सहयोगी सदस्यत्व देण्यात आले. यावेळी शिंदे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती