महाराष्ट्र

संभाजीनगरला ड्रग्जच्या कारखान्यावर छापे ५०० कोटींचे कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त

प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उघड करण्यात आलेली नाहीत

नवशक्ती Web Desk

छत्रपती संभाजीनगर : अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगर येथे सुमारे ५०० कोटी रुपयांचे कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. रसायनांच्या आडून ड्रग्ज तयार केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचा पुरवठा कुठे केला जात होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याची गुप्त माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची दोन पथके तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान रसायन बनवण्याच्या आडून ड्रग्जच्या निर्मितीचा मोठा कारखानाच चालवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही मोठी कारवाई केली. संभाजीनगरमधील या कारखान्यातून २०० कोटी रुपयांच्या तयार ड्रग्जसह ३०० कोटी रुपयांचा कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचा पुरवठा कुठे केला जात होता, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे