छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार कामगिरी करत राजकीय ताकद सिद्ध केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, ७४ पैकी तब्बल ३८ नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले आहे. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सतीश चव्हाण यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदावरही विजय मिळवत भाजप आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय जाधव यांनी २२५२ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. याच नगरपरिषदेत २० पैकी ११ जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
जिल्ह्यातील एकूण १६० नगरसेवक पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ३८ नगसेवक निवडून आणले. तसेच गंगापूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष आणि ११ उमेदवार निवडूण आणत आमदार प्रशांत बंब यांनादेखील धक्का दिला आहे.
गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय जाधव २२५२ मतांनी विजयी झाले. जिल्ह्यातील एकूण १६० नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीने ७४ उमेदवार उभे केले होते. यामध्ये गंगापूर नगरपरिषदेत २० पैकी ११, खुलताबादमध्ये २० पैकी ९, कन्नडमध्ये २० पैकी १२, वैजापूरमध्ये ९ पैकी ४, पैठणमध्ये २ पैकी २ अशा एकूण ३८ जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे.