एक्स @SureshDhasBJP
महाराष्ट्र

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक - सुरेश धस

संतोष देशमुख हत्या प्रकरण : बीडचा बिहार नाही तर यांनी हमास, तालिबान करून ठेवला आहे. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मनात राग ठेवा.

Swapnil S

बीडचा बिहार नाही तर यांनी हमास, तालिबान करून ठेवला आहे. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मनात राग ठेवा. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती. नंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून ५० लाख रुपये घेण्यात आले. ही माहिती खोटी निघाली, तर मी राजकारण सोडेन, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.

“१४ जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीचा शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. मला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने वाल्मिक कराडने जोशीला खडसावले. त्यानंतर १९ जूनला अवादा कंपनी आणि आय. एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठांनी २ कोटी रुपये देण्याची सहमती दाखवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच ५० लाख रुपये द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने त्यांना ५० लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मिक कराडने घेतले, हे मला माहीत नाही. मात्र धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्या,” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. “सातपुडा सरकारी बंगल्यावर या बैठका झाल्याची माहिती चुकीची निघाली तर राजकारण सोडून देईन, असे चॅलेंज देतो. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणीही धस यांनी केली.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश