साताऱ्यात वडिलांकडून मुलीची हत्या; मोबाईलच्या अतिवापराने संताप 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

साताऱ्यात वडिलांकडून मुलीची हत्या; मोबाईलच्या अतिवापराने संताप

मोबाईलचा अतिवापर, चुकीची संगत आणि आई-वडिलांशी उर्मटपणे बोलणे, शिवीगाळ करणे आदींमुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बॅटने मारहाण करून तिची हत्या केली आहे. ही घटना साताऱ्यातील गोडोली परिसरात उघडकीस आली आहे.

Swapnil S

कराड : मोबाईलचा अतिवापर, चुकीची संगत आणि आई-वडिलांशी उर्मटपणे बोलणे, शिवीगाळ करणे आदींमुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बॅटने मारहाण करून तिची हत्या केली आहे. ही घटना साताऱ्यातील गोडोली परिसरात उघडकीस आली आहे.

आर्या पुरुषोत्तम कदम असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणी वडील पुरुषोत्तम कदम यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

४ ऑक्टोबर रोजी आर्याला राहत्या घरातून बेशुद्ध अवस्थेत खासगी वाहनाने सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली भोसले यांनी सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : आंदोलकांवर कारवाईचा बडगा! MPSC विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन

Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई

Mumbai : न्यायालयाच्या कामकाजाचे गुपचूप रेकॉर्डिंग करणे पडले महागात

Ulhasnagar : महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल