साताऱ्यात ध्वनिवर्धक व लेझर लाइटविरोधात ज्येष्ठांची वज्रमूठ; राजवाडा ते पोलीस करमणूक केंद्र मार्गावर आंदोलन संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

साताऱ्यात ध्वनिवर्धक व लेझर लाइटविरोधात ज्येष्ठांची वज्रमूठ; राजवाडा ते पोलीस करमणूक केंद्र मार्गावर आंदोलन

साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारा ध्वनिवर्धकांचा दणदणाट तसेच डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लेझर लाईटच्या वापराला ज्येष्ठ नागरिकांनी सुरुवातीपासूनच विरोध नोंदविला आहे.

Swapnil S

कराड : साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारा ध्वनिवर्धकांचा दणदणाट तसेच डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लेझर लाईटच्या वापराला ज्येष्ठ नागरिकांनी सुरुवातीपासूनच विरोध नोंदविला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी, शुक्रवारी (२५ सप्टेंबर) ज्येष्ठ नागरिक संघांसह विविध २१ संघटना एकत्र येत मूक मोर्चा काढणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता राजवाडा येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो पोलीस करमणूक केंद्रापर्यंत जाणार आहे.

दरवर्षी गणेश आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ध्वनिवर्धकांसह लेझर बीमचा वापर केला जातो. ध्वनिवर्धकांच्या अनियंत्रित वापराचा त्रास ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच लहान-मोठ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा ज्येष्ठ नागरिकांनी याविरोधात वज्रमूठ आवळत पोलिसांसह अन्य प्रशासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला होता.

या पाठपुराव्याची दखल घेत गणेशोत्सवादरम्यान ध्वनिवर्धकांसह अन्य वाद्ये आणि लेझर लाईटच्या वापरावर मर्यादा आल्याने ध्वनिप्रदूषणाची पातळी नियंत्रणात राहिली. त्यामुळे गणेश आगमनाचे सोहळे काहीअंशी सुखकारक झाले. आता विसर्जन सोहळाही शांततेत पार पडावा, यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्णय व निर्बंध असतानाही ध्वनिवर्धकांचा वापर होत असल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्याध्यक्ष जयंत देशपांडे यांनी केले आहे. साताऱ्यातील नागरिकांनीही या मूक मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

संघटनांचा सहभाग

या मूक मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन, एनआयएमए, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन ऑफ इंडियाची सातारा शाखा, पुण्यशील सुमित्राराजे ज्येष्ठ नागरिक संघ, शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संघ, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ, जिहे येथील अभिनव ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ, समता ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थनगर माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, कोडोली ज्येष्ठ नागरिक संघ, व्याजवाडी येथील बाळसिद्धनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, उडतारे येथील उत्तरा ज्येष्ठ नागरिक संघ, करंजे येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था, राजवाडा ज्येष्ठ नागरिक संघ, सहवास महिला ज्येष्ठ नागरिक संघ, (कै.) कर्मवीर डॉक्टर मार्तंडराव सूर्यवंशी चाचा फाउंडेशन, सदरबझार लोककल्याण समिती, स्वास्थ्यम फिटनेस आणि ज्ञानविकास मंडळ यांचा समावेश आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बाप्पाला निरोप देण्यासाठी ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा सज्ज; ठाणे, कल्याण-बदलापूर, भिवंडी परिसरात ४,५०० पोलिसांचा फौजफाटा

११ वर्षांत दुष्काळाचा सातवा फेरा; यंदा दुष्काळाची परिस्थिती अतिभीषण

Thane : पितृपक्षात तर्पण विधी महागले; सामान्यांच्या आवाक्याबाहेर दक्षिणा, कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी

उरण : जेएनपीए बंदरावर तीन कोटींचे बेकायदेशीर फटाके जप्त; DRI च्या अधिकाऱ्यांची कारवाई, मुख्य संशयिताला अटक

Thane : शनिवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद