महाराष्ट्र

हा तर सातारचा बाहुबलीच!

रविवारी दिवसभर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण-खटावमध्ये पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. या पावसामुळे माण तालुक्यातील अनेक रस्तेही बंद झाले आहेत.अचानक आलेल्या तुफान पावसाने शेतात गेलेल्या गाड्या बाहेर काढणेही मुश्कील झाले. अशीच परिस्थिती उद्धवल्याने विनय घोरपडे या तरुणाने थेट आपली स्पेंडर गाडी खांद्यावरुन उचलून घेतली

Swapnil S

कराड : रविवारी दिवसभर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण-खटावमध्ये पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. या पावसामुळे माण तालुक्यातील अनेक रस्तेही बंद झाले आहेत. अचानक आलेल्या तुफान पावसाने शेतात गेलेल्या गाड्या बाहेर काढणेही मुश्कील झाले. अशीच परिस्थिती उद्धवल्याने विनय घोरपडे या तरुणाने थेट आपली स्पेंडर गाडी खांद्यावरुन उचलून घेतली अन् चिखलातून वाट काढत बाहेर आणली. मात्र माण तालुक्यातील कुळकजाईमधील तरुणाने हा अचंबित करणारा पराक्रम केला.

रस्त्यावर चिखल झाल्याने त्याला गाडी बाहेर काढणेही शक्य नव्हते. त्यामुळेच या धाडसी पठ्ठ्याने थेट गाडी खांद्यावर घेतली अन् चिखलातून बाहेर काढली. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी हा व्हिडिओ व फोटो काढले असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.काही नेटकऱ्यांनी सातारचा बाहुबली म्हणत या तरुणाचे कौतुक केले आहे तर काही जणांनी शाब्बास रे पठ्ठ्या म्हणत या तरुणाचे कौतुक केले आहे.

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती