सावंतवाडीत उभे राहणार कोकणातले पहिले ‘सैनिक स्कूल’  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

सावंतवाडीत उभे राहणार कोकणातले पहिले ‘सैनिक स्कूल’; ‘भोसले सैनिक स्कूल’ला केंद्र सरकारची अधिकृत मान्यता

श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूलला नुकतीच अधिकृत मान्यता मिळाली असून सावंतवाडी शहरात ही सैनिक शाळा उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूलला नुकतीच अधिकृत मान्यता मिळाली असून सावंतवाडी शहरात ही सैनिक शाळा उभारण्यात येणार आहे.

संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि नवी दिल्लीतील सैनिक स्कूल सोसायटीच्या माध्यमातून मिळालेल्या या मान्यतेमुळे कोकणातील हे पहिले सैनिक स्कूल ठरणार आहे. शहरातील चराठे येथील भोसले नॉलेज सिटीच्या भव्य संकुलात येत्या १५ नोव्हेंबर रोजी या शाळेचे उद्घाटन तसेच शाळेच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सैनिक स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल रत्नेश सिन्हा तसेच जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये उपस्थित होते.

सुमारे १५ एकरांवर उभारण्यात येणाऱ्या या शाळेच्या कॅम्पसमध्ये शैक्षणिक इमारती, ट्रेनिंग ब्लॉक्स, हॉस्टेल्स, ड्रिल ग्राउंड, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा सर्व सैनिकी शिक्षणाच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असतील. या इमारतींची उभारणी सध्या सुरू आहे. शाळेची औपचारिक प्रवेश प्रक्रिया १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ‘भोसले नॉलेज सिटी’ ही अभियांत्रिकी, फार्मसी आणि विविध विषयांचे अत्याधुनिक शिक्षण देणारी, जिल्ह्यातील सर्वात भव्य आणि प्रतिष्ठित अशी एकमेव शिक्षणसंस्था आहे.
अच्युत सावंत-भोसले, कार्याध्यक्ष श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी

या शाळेची एकूण प्रवेश क्षमता १६० विद्यार्थ्यांची असून त्यापैकी ४० जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. दरवर्षी सहावी आणि नववी इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘AISSSEE’ (All India Sainik School Entrance Examination) या परीक्षेद्वारे पार पडेल.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश