महाराष्ट्र

प्रा. साईबाबा दोषमुक्ती: महाराष्ट्र सरकारची आदेशाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली

आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Swapnil S

नवी दिल्ली : माओवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपातून दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि इतरांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच निर्दोष मुक्तता केली. या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

न्या. भूषण गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या पीठाने राज्य सरकारची याचिका दाखल करून घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सकृतदर्शनी संयुक्तिक आहे, असे निरीक्षण पीठाने नोंदविले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली, ही मागणीही पीठाने फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ मार्च रोजी प्रा. साईबाबा आणि इतरांना माओवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. फिर्यादी पक्ष त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे सादर करू शकला नसल्याचे कारण पीठाने दिले होते. इतकेच नव्हे, तर खंडपीठाने साईबाबांची जन्मठेपेची शिक्षाही रद्द केली आणि अन्य पाच आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली होती.

आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू