जळगावची जागा द्या, अन्यथा मैत्रीपूर्ण लढू द्या; गुलाबराव पाटलांच्या पुत्रासाठी शिंदे गट आक्रमक 
महाराष्ट्र

जळगावची जागा द्या, अन्यथा मैत्रीपूर्ण लढू द्या; गुलाबराव पाटलांच्या पुत्रासाठी शिंदे गट आक्रमक

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना शिंदेगट आता ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

Swapnil S

जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना शिंदेगट आता ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पुत्राला आमदार बनवण्यासाठी आक्रमक झाले आहे.

सोमवारी सायंकाळी जळगावातील एका बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, ‘जळगावची जागा द्या… अन्यथा आम्हाला मैत्रीपूर्ण लढू द्या,’ अशी स्पष्ट भूमिका मांडली गेली असून बैठकीनंतर जळगाव जिल्हयातील शिंदे गटाचे आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाइी मुंबईला रवाना झाले. दरम्यान जळगावची जागा ही भाजपाची असून ती भाजपा लढवण्यावर ठाम आहे. या जागेसाठी भाजपाचे गिरीश महाजन ठाम आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुलाला आमदार बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जागा वाटप निश्चित न झाल्याने शिवसेनेत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली.

या बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तातडीने मुंबईकडे रवाना झाले. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले