अशोक खरात कुटुंबाभोवती SITचा फास; जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार 
महाराष्ट्र

अशोक खरात कुटुंबाभोवती SITचा फास; जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली असून येथील ‘एसआयटी’ पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे, तर पत्नी कल्पना खरात फरार झाल्या असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी आता शोधमोहीम हाती घेतली आहे.

Swapnil S

नाशिक : शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली असून येथील ‘एसआयटी’ पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे, तर पत्नी कल्पना खरात फरार झाल्या असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी आता शोधमोहीम हाती घेतली आहे. शिर्डीतील चार एकर जमीन गैरव्यवहार आणि सावकारी प्रकरणात मूळ मालक शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीनंतर शिर्डी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, तपास यंत्रणांनी आता आपला मोर्चा खरातच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक सक्रिय झाले असून, खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकेसाठी पोलिसांनी थेट त्यांच्या ‘तृप्तबाला’ बंगल्यावर धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे, बंगल्याचा दरवाजा उघडण्यास नकार दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क शेजारील भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला.

यावेळी कल्पना खरात आढळल्या नसल्या तरी, चौकशीसाठी खरातच्या मुलाला हर्षवर्धन अशोक खरात याला पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण लागले असून खरातच्या साम्राज्याभोवती अटकेचा फास आवळला जात आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुखंड खरेदी व्यवहाराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी व सावकारी कायद्यानुसार भोंदूबाबा अशोक खरात, त्याची पत्नी व इतर तिघे अशा एकूण ५ जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात दोघांना अटक केल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली. याप्रकरणी अरविंद बावके (रा. साकुरी, राहाता) व किरण सोनवणे (रा. शिर्डी) या दोघांना  अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.

तपास यंत्रणांची धडक कारवाई

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ३ महिला अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कर्मयोगी नगर येथील खरातच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली आहे. शिर्डी लगतच्या निघोज भागातील गट नंबर १०६/२ या जमिनीच्या संशयास्पद व्यवहारप्रकरणी ही कारवाई केली जात आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन