अंबादास दानवे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमक्यांचे फोन आल्याचे तसेच फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार दानवे यांनी छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे केली आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमक्यांचे फोन आल्याचे तसेच फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार दानवे यांनी छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे केली आहे.

अज्ञात व्यक्तीने १५ मार्च रोजी रात्री ०२ वाजता सतत कॉल करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद असून ‘कापून टाकू’ आणि ‘ठोकून काढू’ अशी धमकी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. ११ ते १४ मार्च रोजी असे दूरध्वनी कॉल आल्याचेही दानवे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलिसांनी दानवेंच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ही धमकी कुणी दिली? याचा तपासही सुरू केला आहे. फोन कॉल कोणत्या क्रमांकावरून आला? तो कुठून करण्यात आला? व त्यामागे कुणाचा हात असू शकतो? अशा विविध प्रश्नांचा माग पोलीस काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सायबर सेलचीही मदत घेण्यात येत आहे.

अंबादास दानवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हा प्रकार सांगितला. “सुरुवातीला हा धमक्यांचा सिलसिला मी गांभीर्याने घेतला नव्हता. गत काही दिवसांपासून मला अज्ञात व्यक्तीकडून धमक्या येत होत्या. आज पहाटे दोन वाजताच्या सुमारास मला पुन्हा फोन आला. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत, असे त्यांनी सांगितले. दानवे यांनी आपल्या तक्रातीत त्यांनी ज्या क्रमांकावरून फोन आला तो क्रमांकही दिला आहे.

Mumbai Local Train Update : कल्याण-बदलापूर मार्गिका २०२८ मध्ये; बोरिवली-विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित