अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा; तब्बल ४६ वर्षांनंतर शेकापचा लालबावटा उतरला  
महाराष्ट्र

अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा; तब्बल ४६ वर्षांनंतर शेकापचा लालबावटा उतरला

अलिबाग पंचायत समितीवर तब्बल ४६ वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला असून सभापतीपदी भाग्यता नंदन पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

Swapnil S

अलिबाग : अलिबाग पंचायत समितीवर तब्बल ४६ वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला असून सभापतीपदी भाग्यता नंदन पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत १४ पैकी १२ जागा जिंकत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भारतीय जनता पक्षाला एक आणि शेतकरी कामगार पक्षाला एक जागा मिळाली होती. स्पष्ट बहुमत असल्याने सभापती व उपसभापती पदासाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित मानले जात होते. भाग्यता पाटील आणि प्रिया भगत यांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव

अलिबाग पंचायत समितीवर गेली ४६ वर्षे शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत शेकापचा मोठा पराभव झाला असून त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. निवडीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर व अनंत गोंधळी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय