प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

सिंधुदुर्गमध्ये चार स्वराज्य संस्थांची निवडणूक; ७४ मतदान केंद्रे निश्चित; दुबार मतदारांचा तपास पूर्ण

सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला या तीन नगरपरिषदांसह कणकवली नगरपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण ७४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीत ५७ हजार २०७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Swapnil S

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला या तीन नगरपरिषदांसह कणकवली नगरपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण ७४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीत ५७ हजार २०७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंधकर आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते.

२ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. यामध्ये पुरुष २७,६९७ तर महिला २९,५१० असे एकूण ५७,२०७ मतदार आहेत.

अवैध मतदानाविरोधात कठोर पावले

अवैध मतदानाला कोणत्याही परिस्थितीत संधी दिली जाणार नाही, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. मतदान स्थळी वीज, पाणी, पक्की इमारत, शौचालय यांसारख्या सर्व सुविधांची योग्य व्यवस्था उपलब्ध असेल. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.

उमेदवारांच्या खर्च मर्यादा

जिल्ह्यातील निवडणुका ‘क’ वर्गात मोडणाऱ्या असल्याने खर्च मर्यादा पुढीलप्रमाणे राहणार आहे

नगरपरिषद

  • नगराध्यक्ष : ७ लाख ५० हजार रुपये

  • सदस्य : २ लाख ५० हजार रुपये

नगरपंचायत

  • नगराध्यक्ष : ६ लाख रुपये

  • सदस्य : २ लाख २५ हजार रुपये

मतदार याद्यांची पडताळणी करताना २७५ दुबार आणि तिबार मतदार आढळले आहेत. तसेच जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पाडली जाईल. ज्या कार्यक्षेत्रात निवडणूक होत आहे, फक्त तेथेच आचारसंहिता लागू आहे. परंतु त्या क्षेत्रातील मतदारांना प्रभावित करतील अशी वक्तव्ये इतरत्र करू नयेत.
तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी

५७ हजार २०७ मतदार मतदानासाठी सज्ज

Mumbai : १ फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन वाहतूक नियम; कोंडी कमी करण्यासाठी निर्णय, कोणत्या वाहनांना परवानगी? कोणाला नो एंट्री?

"दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..."; अजित पवारांच्या आठवणीत रोहित पवारांची भावूक पोस्ट

शिंदे गटाला मोठा धक्का; म्हसळा नगरपंचायतीतील सात नगरसेवक अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने खळबळ

जिल्हा परिषद निवडणूक : NCP उमेदवाराच्या अर्जाला विरोध करणाऱ्या BJP उमेदवाराला HC चा दणका; एक लाखाचा दंड, याचिकाही फेटाळली

Thane : महापौरपद नाही तर उपमहापौरपदही नको; भाजपची भूमिका स्पष्ट