सिंहगडमध्ये 'अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी'चा फलक; वादग्रस्त फलक पोलिसांनी हटवला, तपास सुरू 
महाराष्ट्र

सिंहगडमध्ये 'अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी'चा फलक; वादग्रस्त फलक पोलिसांनी हटवला, तपास सुरू

सिंहगड परिसरात 'अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी' अशा आशयाचा फलक लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने संबंधित फलक हटवला आहे.

Swapnil S

पुणे : सिंहगड परिसरात 'अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी' अशा आशयाचा फलक लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने संबंधित फलक हटवला आहे. सिंहगडावरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहनतळाच्या जवळ हा वादग्रस्त फलक लावण्याचा प्रकार मंगळवारी (१४ जुलै) उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित फलक हटवला. संबंधित फलकाचे छायाचित्र समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मिस फराह चॅरिटेबल फाऊंडेशनकडून ई-मेलद्वारे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त अधीक्षक शुभम कुमार, हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली.

ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वादग्रस्त फलक लावणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सिंहगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपाासण्यात येणार आहे. फलक लावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे’, असे मिस फराह फाऊंडेशनकडून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सिंहगडाच्या पायथ्याशी वाहनतळाजवळ वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी अद्याप वनविभागाकडून पोलिसांकडे अधिकृत तक्रार देण्यात आली नाही. तक्रार आल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल. फलक लावणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
राजेश रामाघरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video