freepik
महाराष्ट्र

सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये मानसोपचार तज्ज्ञ नेमणार; राज्य शासनाचा निर्णय

विद्यार्थ्यांना येणारे वैफल्य व अन्य मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : विद्यार्थ्यांना येणारे वैफल्य व अन्य मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे.

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्याच्या डिजीटल युगात विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक तणावात वाढ झाली आहे. अनेकदा विद्यार्थी वैफल्यग्रस्त होतात. ते आपल्या भावनाही व्यक्त करत नाहीत. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालले आहे. या समस्येवर निदान होऊन त्यांना समुपदेशन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनात पुन्हा आनंद येऊ शकतो. मानसोपचार विभागाचे प्राध्यापक, मानसोपचार विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व अधीक्षक यांची तीन सदस्य समिती राज्यातील प्रत्येक वैद्यकीय शिक्षण संस्थेवर देखरेख करेल. यात विशेष हेल्पलाईन, नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्यान, शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संवाद आदी उपक्रम हाती घेतले जातील. दोन समुपदेशकांची दरमहा ३० हजार वेतनावर कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता