महाराष्ट्र

नांदेड : खाऊच्या बहाण्याने तिसरीच्या वर्गातील चिमुकलीवर अत्याचार

भोकर तालुक्यात इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर गावातील एका मुलाने बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली.

Swapnil S

नांदेड : भोकर तालुक्यात इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर गावातील एका मुलाने बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सदर मुलगी शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत होती. यावेळी घराजवळच राहणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला बोलावून घेतले व पैसे देऊन दुकानातून खाऊ आणण्यास सांगितले. मुलीने दुकानातून खाऊ आणल्यानंतर आरोपीने घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. रात्री उशिरा पीडित मुलीस वेदना होऊ लागल्याने पीडितेच्या आईस घडलेली घटना कळली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रविवारी आरोपीविरुद्ध पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.

BMC Election : जागावाटपाचा तिढा; मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट १२५ जागांसाठी आग्रही

‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी गांधी कुटुंबाला दिलासा; ED चे आरोपपत्र स्वीकारण्यास न्यायालयाचा नकार

ॲप आधारित कार-बाइक मोकाट

पुरवणी मागण्यांच्या टोपी खाली दडलंय काय?

आजचे राशिभविष्य, १७ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत