संग्रहित छायाचित्र  छाया सौजन्य : ANI
महाराष्ट्र

"मिस यू दादा! तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज..."; अजित पवारांच्या आठवणीने सुप्रिया सुळे गहिवरल्या

"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि...

Swapnil S

राज्यभरात भाऊबीज सणाचा उत्साह असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीत भावुक पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यांनी 'दादां'सोबतचे भाऊबीजेचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यावर अखेरीस 'मिस यू दादा' असे लिहित भावनांना वाट मोकळी करून दिली.

तू मनात कायम आहेस आणि कायम राहशील

"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात. दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील", असं म्हणत त्यांनी भावाच्या आठवणीने दाटून आलेल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा

अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत राज्यात पुन्हा जोरदार चर्चा सुरू आहे. 'अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण पाहता आले असते. मात्र आता विलीनीकरणाबाबत पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील', असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. तटकरे यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर ते म्हणाले की, “ पाडव्याच्या दिवशी अजित पवार आपल्यात नसताना इथे येण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे, याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. गेली ३० वर्षे आम्ही पाडव्याला बारामतीला येतो, पण या वर्षी बारामतीमध्ये उसळलेला जनसागर आम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. बारामतीमधील पाडवा अजित पवारांशिवाय साजरा होत आहे, हे मनाला पटणे कठीण आहे. आम्ही फक्त त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे आलो आहोत. अशावेळी कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नाही. मात्र तरीही विलिनीकरणाचा मुद्दा असेल, तर पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार याच त्यासंदर्भातील निर्णय घेतील.

बारावीची ९, दहावीची १५ फेब्रुवारीपासून परीक्षा; CISCE बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

आसाममध्ये रेल्वेचा मोठा अपघात! कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले; बचावकार्य सुरू, Video

Mumbai : गिरगाव चौपाटीवर छठपूजेला परवानगी देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा तातडीचा दिलासा नाही

पुन्हा ५००, २००० रु.च्या नोटा बंद करा; आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का