महाराष्ट्र

अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा सुप्रिया सुळेंकडून समाचार; म्हणाल्या, "अजित दादा..."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास निवडणुकांसाठी तयार असतो, आम्हाला अदृश्य शक्तींची भीती वाटत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Rakesh Mali

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात "काही लोक 84 वर्षांचे झाले तरी थांबत नाहीत", असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. "अजित दादा 65 वर्षाचे सीनियर सिटीझन आहेत", असे म्हणत सुळे यांनी त्यांना टोला लगावला.

ही लोकशाही आहे. त्यांचे वय 84 असूनही ते इतके काम करत आहेत. दादांसाठी अडचण कशाला? त्यांचा करिअर ग्राफ बघा, असे म्हणत सुळे यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. आज पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

जागा वाटपावरही भाष्य-

महाविकास आघाडीत मुंबईतील दक्षिण आणि ईशान्य लोकसभा मतदारसंघाबाबत वाद आहेत. त्यावरही सुळे यांनी भाष्य केले. शरद पवार गटातील दक्षिण आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरुन वाद मिटवला जाईल. शरद पवार हा तिढा सोडवतील. त्याची फार चिंता वाटत नाही. येत्या 8 ते 10 दिवसात महाविकास आघाडीतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

अदृश्य शक्तींची भिती वाटत नाही-

यावेळी बोलताना सुळे यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत आम्हाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास निवडणुकांसाठी तयार असतो, आम्हाला अदृश्य शक्तींची भीती वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली