महाराष्ट्र

"...तोपर्यंत सुषमा अंधारेंना नाशिकमध्ये प्रवेश देणार नाही", अंधारेंविरोधात शिंदे गट आक्रमक

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा ड्रग्ज माफियांशी संबंध जोडल्याने हा वाद निर्माण झाला आहे

नवशक्ती Web Desk

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावरुन केलेल्या गंभीर आरोपांवरुन नाशिक येथील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत सुषमा अंधारे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं आहे. सुषमा अंधारे यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत सुषमा अंधारेंना नाशिकमध्ये प्रवेश देणार नाही. असा इशारा शिंदे गटाच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा ड्रग्ज माफियांशी संबंध जोडल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी अंधारे यांनी आरोप सिद्ध करा अन्यथा मालेगाव शहरवासीयांची माफी मागावी, असं प्रति आव्हान दिलं. त्यांनंतर नाशिकच्या शिंदे गटाने ललित पाटीलचे ठाकरे गटातील नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल केले. त्यानंतर आता दादा भुसेंवर आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांचा जोड मारुन निषेध करण्यात आला आहे. नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशेजारी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांचे ड्रग्ज माफिया ललित पाटील सोबतचे फोटो देखील झळकावले आहेत.

यावेळी नाशिकमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत नाशिकमध्ये सुषमा अंधारे यांना प्रवेश देणार नाही. असा इशारा देण्याता आला आहे. त्यामुळे हा वाद आणखीनच टोकाला जाण्याची शक्यता आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव