प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

शिक्षकांचे अधिकचे शिक्षण सर्व्हिस बुकमध्ये नोंदविले जाणार; शिक्षकांना होणार फायदा : शिक्षण उपसंचालक

शाळेत अध्यापन करत असतानाच उच्च शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता सर्व्हिस बुकमध्ये नोंदवण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी शाळांना दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : शाळेत अध्यापन करत असतानाच उच्च शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता सर्व्हिस बुकमध्ये नोंदवण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी शाळांना दिले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांना लाभ होणार आहे. याबाबतचे आदेश मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत.

शिक्षकांची अधिकची शैक्षणिक पात्रता नोंदविण्यात येत नसल्याची तक्रारी मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे आल्या होत्या. याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन शिक्षकांची अधिकची शैक्षणिक पात्रता सर्व्हिस बुकमध्ये नोंद करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उच्च किंवा अधिकची प्राप्त शैक्षणिक अर्हता सेवा पुस्तिकेत नोंदविण्याबाबतचे आदेश शाळांना दिले आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उच्च किंवा अधिकची शैक्षणिक अर्हता प्राप्त करीत असतात.

सुप्रीम कोर्टात मोठा गदारोळ; CJI गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न

''रोहित पवारांना फोटो कुठून मिळाला?'' रमी प्रकरणी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव; माफीची मागणी

भिक्षागृहातील भिक्षुकांच्या मानधनात वाढ; आता दररोज ५ ऐवजी ४० रुपये मिळणार, ऑक्टोबरपासून मिळणार वाढीव मानधन

‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही; भारतीय हवामान खात्याचा दिलासा

उल्हासनगर : खोट्या कागदपत्रांवर मिळवला GST परतावा; राज्यकर विभागाने उघडकीस आणला महाघोटाळा!