महाराष्ट्र

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एका शिक्षकाने इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Swapnil S

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एका शिक्षकाने इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बापूसाहेब धुमाळ असे या शिक्षकाचे नाव असून तो दौंड तालुक्यातील मळद इथल्या भैरवनाथ विद्यालयामध्ये शिक्षक आहे. या संदर्भात पालकांना माहिती मिळाल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासन व पोलीस प्रशासनाला याबाबत जाब विचारला आहे. पोलिसांनी या शिक्षकाचा मोबाईल ताब्यात घेतला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनी ही नववी इयत्तेमध्ये शिकत असल्याची माहिती समोर येत आहे

बापू धुमाळ हा इंग्रजी विषयाचे अध्यापन करतो. व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर तो अत्याचार करीत असे. एका पीडित मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेनंतर मळद गावातील ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्गुरू सेवा शिक्षण संस्था संचलित श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मळद (नवीन माध्यमिक विद्यालय) हे विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे असून संस्थाचालक बबन रणवरे हे आहेत.

या घटनेमुळे दौंड तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल